भारतीय स्त्रीजीवन
भारतीय स्त्रीजीवन एकोणिसाव्या शतकाच्या प्रबोधनाच्या उलाढालींमध्ये स्त्रियांचे प्रश्न केंद्रस्थानी होते. राम मोहन राय, विद्यासागर, अक्षयकुमार दत्त, केशवचंद्र सेन अशा अनेक धुरंधर व्यक्तींनी स्त्रियांना कौटुंबिक दडपणातून बाहेर काढून सुशिक्षित व सुरक्षित करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजामध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी स्वतःच्या घरातही स्त्रीशिक्षणाचे प्रयोग केले. याशिवाय देवेंद्रनाथ टागोरांच्या घराण्यात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच घरातल्या …